News Description
तेली समाज वधु वर परीचय मेळावा
तेली समाज वधु वर परीचय मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
वधु वर सुचक :- श्री द्वारकप्रसाद सातपुते
आरमोरी - श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरी च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम, तेली समाज मेळाव्याचे आयोजन दिनांक ६ मार्च २०२२ ला संताजी मैदान कोसा विकास जवळ, वडसा रोड आरमोरी येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत वधु वर परीचय मेळावा, समाजातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तेली समाज वधु वर मोठ्या संख्याने उपस्थित राहून कार्यक्रमा चे लाभ घ्यावे असे असे आव्हान संस्थे कडून वधु वर सुचक श्री द्वारकप्रसाद सातपुते करीत आहेत
मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद गडचिरोली च्या माजी अध्यक्ष योगिताताई भांडेकर यांच्या हस्ते होणार असून मेळाव्याचे अध्यक्ष किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे असून प्रमुख पाहुणे म्हणून सौ . योगीताताई पिपरे माजी नगराध्यक्ष , नगर परिषद गडचिरोली, प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष म.रा.प्रांतिक तेली समाज महासंघ , प्रभाकरजी वासेकर सदस्य म.रा.प्रांतिक तेली समाज महासंघ प्राचार्य पी . आर . आकरे साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा , मुखरूजी खोब्रागडे अध्यक्ष तेली समाज वैरागड , भाष्करराव बोडणे उपसरपंच ग्रामपंचायत वैरागड, डॉ.प्रा . रविन्द्र विखार श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय , कुरखेडा ,बाबुरावजी कोहळे ,परसरामजी टिकले माजी सभापती पं . स . देसाईगंज ,डॉ . सुरेश रेवतकर वित्त अधिकारी / डिन , गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ,डॉ . संजय सुपारे भेषज अधिकारी प्रा.आ. केन्द्र देलनवाडी ,विनोद दिवाकर बावनकर उपसभापती , पं . स . आरमोरी , दामजी सिताराम नैताम से.नि. नायब तहसिलदार . आदि मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. प्रदिप चापले हे करणार आहेत. तरी परिसरातील समाजबांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरी चे अध्यक्ष बुधाजी किरमे, सचिव देविदास नैताम तसेच पदाधिकारी यांनी केले आहे .