*तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा – चामोर्शी येथे ५ ऑक्टोबर रोजी*



News Description

*तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा – चामोर्शी येथे ५ ऑक्टोबर रोजी* चामोर्शी : समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा, यासाठी तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ (रविवार), सकाळी ११:३० वाजता, श्री संताजी भवन, चामोर्शी, जि. गडचिरोली येथे हा *भव्य मेळावा* पार पडणार आहे. लग्न जुळवण्यापूर्वी परिचय होणे अत्यावश्यक आहे. अशा मेळाव्यांमुळे युवक-युवतींना परस्पर परिचयाची उत्तम संधी मिळते. वेळ, खर्च व श्रम यांची बचत होते आणि पालकांना योग्य निर्णय घेणे सोपे जाते. गावगाड्यातील तसेच शहरातील शिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींसाठी हे *व्यासपीठ* खूप उपयुक्त ठरते. यामध्ये समाजातील विविध भागातून आलेल्या स्थळांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होत असल्याने एकाच दिवशी जास्तीत जास्त योग्य स्थळांचा परिचय होऊ शकतो. हा कार्यक्रम *सुव्यवस्थित, पारदर्शक* व समाजहितासाठी आयोजित केला जात आहे. या मेळाव्याचे आयोजन *श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था* यांच्या सौजन्याने करण्यात आले असून Wadhuwar Parichay OPC Pvt. Ltd. व तेली समाज बांधव हे प्रमुख आयोजक आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरु आहे. 📞 8698690871 | 9421854868 | 8208274671 🌐 rashtriyatelisamaj.com 📲 Teli Samaj Wadhuwar Matrimony App (Google Play Store वर उपलब्ध) समाजातील सर्व माता-भगिनी व बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समाजातील युवक-युवतींसाठी योग्य जोडीदार निवडण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

News