तेली समाज वधू वर परिचय मेळावा उत्साहात पार पाडला



News Description

*तेली समाज वधू-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला* गडचिरोली : तेली समाज आयोजित भव्य वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात आणि उत्साहपूर्ण वातावरणात ५ऑक्टोंबर ला पार पडला. या मेळाव्यात समाजातील तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून सुमारे २०० वधू-वरांनी ऑनलाइन तर १०० वधू-वरांनी ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करून आपला परिचय सादर केला. या प्रसंगी द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री द्वारकाप्रसाद सातपुते यांनी सांगितले की, “लग्न हे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून सात जन्मांचे पवित्र बंधन आहे. त्यामुळे विवाहापूर्वी वधू-वरांचा परस्पर परिचय होणे आवश्यक आहे. अशा मेळाव्यांमुळे समाजातील तरुण-तरुणींना एकमेकांना जाणून घेण्याची उत्तम संधी मिळते.” मेळाव्याचे उद्घाटन माननीय सौ. योगिता ताई पिंपरे, माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते झाले. सह-उद्घाटक म्हणून माननीय सौ. योगिता ताई भांडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय गजानन भांडेकर, सावतेली समाज सदस्य व मार्कंडा देवस्थान अध्यक्ष यांनी भूषविले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महा.प्रा तेली समाज गडचिरोली माननीय बाबुराव कोहडे, माननीय प्रमोद जी पिपरे, माननीय तुळशीदासजी कुंघाडकर सर, माननीय लोमेश बुरांडे (नगरसेवक), माननीय रघुनाथ भांडेकर सर (प्रा. महासभा), माननीय शशिकांत चिचघरे (माजी उपनिरीक्षक), माननीय चोकजी पिपरे (पोलिस उपनिरीक्षक), माननीय व्यंकटेश सोमनकर, श्री राजेंद्र भुरसे, श्री वासुदेव भांडेकर, श्री मधुकर भांडेकर, श्री संजय कुंघाडकर, श्री महेंद्र वसेकर, सौ. कविता किरमे, सौ. कविता बरसगडे, सौ. वनिता चलाख आदी मान्यवर उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजक समितीतील श्री किशोर गव्हरे, बंडू नैतम, नवनाथ बरसगडे, यशवंत भांडेकर, उष्टूजी चलाख, संतोष भांडेकर, दिलीप उडान, गोपीचंद बोदालकर, रमेश नैताम, अमोल कुकडकर, संदीप बोदलकर, अजय कुकडकर, आशिष चलाख, विवेक सातपुते, द्रोणाक्ष सातपुते, जिजाबाई सातपुते, रंजना कुकडकर, वर्षा कुकडकर, सुजाता चलाख, स्वाती कुकडकर, सुरेखा बोदलकर, सुप्रिया चलाख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांचे आभार व्यक्त करून पितांबर कुकडकर सर यांनी केली.

News