 
    			
    			
    			
    			News Description
    			
                 
                 	*लग्न सोहळ्यात संताजी जगनाडे महाराज  प्रतिमेला हार पुष्प ने पूजन करून वधु वर ने घातली गळ्यात वधुवरमाला*
खरपंडी येथे:- दिनांक ४/३/२०२२ रोज शुक्रवारी ची.प्रशांत संग ची.सुप्रियाताई तेली समाज आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला लग्न सोहळ्यात निमंत्रित इष्टमित्र पाहुणे मंडळी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार ने पूजन करून घातली गळ्यात  वधुवरमला
संताजी चे आदर्श विचार  तेली समाजात कायमस्वरूपी रहावे व घरा घरा पर्यन्त पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून श्री द्वारकप्रसाद सातपुते  यांच्या मार्गदर्शनाखाली लग्न सोहळ्यात संताजी पूजना चे कार्यक्रम घेण्यात आले
लग्न सोहळ्यात वर पक्ष कडून वडील श्री उष्टुजी चालक शिक्षक उच्चश्रेणी, खरपंडी वधु पक्ष कडून वडील श्री भालचंद्र टिकले  पाटील जीवनगटा दोनी परिवार पाहुण्यांना एकाच मंडपात  निमंत्रित करून लग्नाचे आयोजन केले होते कार्यक्रमात गावकरी पाहुणे इष्टमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत चालक परीवार कडून करण्यात आले
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री द्वारकप्रसाद सातपुते राष्टीय तेली समाज अध्यक्ष,श्री एकनाथ जी टिकले पाटील तेली समाज खरपंडी,श्री यशवंत भांडेकर,उमेश कुनघाडकर तळोदी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पढले
संचालन श्री पितांबर कुकडकर माजी शिक्षक गडचिरोली याने केले तर पाहुण्यांचे आभार आशिष चालक याने मानले