News Description
https://www.rashtriyatelisamaj.com/Index/
*🗞️ तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा — गडचिरोलीत भव्य आयोजन*
RTSगडचिरोली | प्रतिनिधी
समाजातील सुशिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना एकत्र आणून योग्य स्थळ-जुळवणीसाठी विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था व समाज सदस्यांच्या सहकार्याने तसेच Wadhuwar Parichay OPC Pvt. Ltd. यांच्या संयोजनातून आयोजित करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी अनेक योग्य स्थळांची माहिती उपलब्ध होऊन वेळ व खर्चाची बचत व्हावी, तसेच समाजातील नाती दृढ करणे व हुंडामुक्त विवाहाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
*दिनांक : २२ फेब्रुवारी २०२६ (रविवार)*
📍 स्थळ : संताजी स्मृती प्रतिष्ठान, पटवारी भवन मागे, आरमोरी रोड, *गडचिरोली*
या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून
मा. सौ. योगिता प्रमोदजी पिपरे (माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका, न.प. गडचिरोली) उपस्थित राहणार आहेत.
सहउद्घाटक —
मा. श्री बाबुरावजी कोहळे, उपाध्यक्ष, विदर्भ महा. तेली महासभा
कार्यक्रम अध्यक्ष —
मा. श्री प्रभाकरजी वासेकर, अध्यक्ष, संताजी स्मृती प्रतिष्ठान, गडचिरोली
यावेळी नगरपरिषद गडचिरोलीतील मान्यवर पदाधिकारी, अधिवक्ता वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, विविध तेली समाज संघटनांचे पदाधिकारी, सेवानीवृत्त कर्मचारी, शिक्षक, व्यापारी वर्ग व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
समाजातील वधू-वर तसेच पालक-समाजबांधवांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या समाजातील युवक-युवतींना योग्य संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
✨ आपली उपस्थिती म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले योगदान आहे. ✨